Home Breaking News वीज पडून बैल ठार

वीज पडून बैल ठार

92
0

बोरीअरब – दारव्हा तालुक्यातील मौजा मोझर  (ई ) येथील राजेश गडमडे (रा. यवतमाळ) यांच्या शेतात मंगळवारी (ता. 15)  रोजी दरम्यान सोनबा महादेव वाठोडे बैल चारत असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन पाऊस सुरू झाला. बैल चरत असताना वीज पडून बैल जागेवरच ठार झाला. आणि शेतकरी सोनबा वाठोडे हा ईसम जखमी झाला त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी सदर घटनेचा पंचनामा  तलाठी  आर एम शहा यांनी  केला.यावेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख प्रवीण ठाकरे, मारुती घडमडे, सुरेश वाटोडे ,राजू पारिसे, विनोद मडावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here