Home Breaking News उद्यापासून खरेदीसाठी पंचवीस दिवस खास

उद्यापासून खरेदीसाठी पंचवीस दिवस खास

135
0

अधिक महिना; मंगलकार्यासह, संपत्तीतील गुंतवणुकीसाठीही चांगला मुहूर्त

यवतमाळ :  १८ सप्टेंबरपासून अधिक महिना सुरू होत आहे. अधिकस्य अधिक फलम् म्हणजे अधिक महिन्यात चांगल्या कार्याचे फळही अधिक मिळते, असे अधिक महिन्याबाबत शास्त्रात म्हटले आहे. मंगलकार्याशिवाय (विवाह, गृहप्रवेश इत्यादी) इतर कार्यांसाठी अधिक महिना शुभ आहे. पूर्ण महिन्यात २५ दिवस खरेदीसाठी शुभ आहेत. यातील १५ दिवसांचे महत्त्व तर अधिक आहे. अधिक महिना संपत्तीतील गुंतवणुकीसाठीही चांगला आहे.

२१, ३० सप्टेंबर, १, ५, आणि १६ ऑक्टोबर वगळता इतर दिवस शुभ असतील. या दिवसांत देवाची भक्ती व धार्मिक विधींचेही पूर्ण फळ मिळेल. तसेच खरेदी आणि इत्यादी कामांसाठी उर्वरित दिवस शुभ असतील. ज्योतिषाचार्यनुसार, कुठल्याही प्रकारच्या खरेदीस मनाई नाही. अधिक महिन्यात सर्वकाही खरेदी करता येते. केवळ स्थावर मालमत्ता खरेदी किंवा बुक करताना कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींकडे लक्ष ठेवायला हवे. दागिने, वाहने, कपड्यांपासून इतर खरेदी करता येईल.

अधिक मासातील हे दिवसही शुभ

वाहन खरेदीचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १० आणि ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येतील.

दागिने खरेदीचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, १९, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ३, ७, ८ आणि १५ तारखेला दागिने खरेदी करता येतील.

नवे कपडे खरेदी करण्याचा मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १८, २२ आणि २६ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये २, ७, ८ आणि १५ तारखेला नवे कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करता येईल.

यज्ञ, हवन इत्यादींसाठीचे शुभ दिन : २६ सप्टेंबर आणि १, ४, ६, ७, ९, ११, १७ ऑक्टोबरला यज्ञ, हवन विधी करता येतील.

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि यंत्रांसाठीचे शुभ मुहूर्त : सप्टेंबरमध्ये १९, २०, २७, २८, २९ तारखेला तर ऑक्टोबरमध्ये ४, १०, ११ तारखेला वाहन खरेदी किंवा बुक करता येईल.

मोठ्या व्यावसायिक कराराचे शुभ मुहूर्त : १९ आणि २७ सप्टेंबरला द्विपुष्कर योगामुळे मोठ्या व्यावसायिक करारांसाठी हे दिवस लाभदायी ठरतील. याशिवाय २१ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोबरही नव्या व्यावसायिक करारासाठी शुभ असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here