Home Breaking News शहरात चायनीज मांज्याची विक्री

शहरात चायनीज मांज्याची विक्री

46
0

उपाययोजना करण्याबाबत जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिका-यांना निवेदन

यवतमाळ : राज्य शासनाने चायनिज मांज्याला बंदी घातली आहे. तरीही देखील शहरातील अनेक रिटेलर व होलसेल पतंगांच्या दुकानात चायनिज मांजा उपलब्ध होतो आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्याने सर्व बच्चे कंपनी, महाविद्यालयीन विद्यार्थी घरीच आहे. त्यामुळे फावल्या वेळात पतंग उडविल्या जात आहे. पतंगबाजी करण्यात चायनिज मांजा अत्यंत घातक असल्याने गंभीर घटना घडू शकतात. यावर बंदी घालून कठोर कारवाई करण्याची मागणी, नुकतेच जिल्हा अल्पसंख्याक विभागने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

पतंगबाजी करतांना चायनिज मांज्यातून अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. अनेकदा हात कापणे, पाय कापणे, अनेक पक्षी अडकूण पडले आहेत, शिवाय अनेक पक्ष्यांचे जिवसुध्दा गेले आहे. परिणामी, पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कित्येकवेळा पर्यावरणप्रेमींनी देखील चायनिज मांज्या बंद करण्याबाबत पुढाकार घेतला होता. तरीदेखील चायनिज मांज्या शहरात सहज उपलब्ध होतो आहे. याबाबत कठोर पाऊले उचलण्याची आवश्‍यकता आहे. जिल्हा अल्पसंख्याक विभाग मार्फत जिल्हाधिकारी  देवेंदर सिंह यांना भेटून निवेदन  देण्यात आले. यावेळी मोहसीन खान माजी कार्यकारी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ अल्पसंख्याक विभाग, तारिक अली काझी, अर्हम शेख, वहाब मंसुर, रेहान शा, पवन खाडे, रवी बंद्रे, रियाज अली, अंकुश पांडे, संकेत कडुकर, परवेज सिद्दीकी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here