Home विशेष गरिबांच्या हक्कासाठी लढणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व… बाळासाहेब’….एक विश्वास….

गरिबांच्या हक्कासाठी लढणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व… बाळासाहेब’….एक विश्वास….

886
0
‘बाळासाहेब मांगुळकर’ हे नाव म्हणजे माणूसकी जपणारं व्यक्तीमत्व. काळाची पाऊले ओळखणारा ध्येयवेडा माणूस. एक कुशल प्रशासक, व्यवस्थापक, रंजल्या, गांजल्यांना माणूसकीचा हात देणारा समाजसेवक. मातीशी नाळ जुडलेला माणूस. कदाचित ही ओळख अपुरी असेल एवढ्या उंचीवर आज ते आहेत. त्यांनी राजकीय क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण केले आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. आज त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यात कोव्हीडयोध्दाची भूमिका बजावली आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठेही प्रसिध्दी माध्यमांपूढे गाजावाजा न करता गरीब जनतेसाठी माणूसकी जपणारा सच्चा सेवक असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेण्याची आजच्या युवा पिढींना आवश्यकता आहे.
बाळासाहेब मांगूळकर यांचा जन्म 04 डिसेंबर 1958ला अमरावतीत झाला. घरची परिस्थिती सर्वसाधारण. कोणताही राजकीय वारसा त्यांना परंपरागत मिळालेला नाही, हे विशेष मानायला हवे. वडील शेतकरी. आई घरकामात व्यस्त. भारी त्यांची कर्मभूमी अशी त्यांची पारिवारिक पार्श्वभूमी होती. शालेय जिवन जगत असताना त्यांना क्रीडा क्षेत्रात आवड होती. त्यांनी कुस्ती, कबड्डीमध्ये तब्बल चार वेळा राष्ट्रीय मैदाने गाजवित जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर कोरले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन जिवनात युवक काँग्रेसमध्ये, काँग्रेस पक्षात विविध पद भूषवित केलेल्या कार्यातून आपल्या नावाचा ठसा उमटविला. इतके पद भूषविले पण त्यांनी कधी गर्व केला नाही. गरिब जनतेच्या प्रश्नाला हळव्या मनाचा कार्यकर्ता मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. पुढे त्यांनी ग्रामपंचायत सरपंच ते जिल्हा परिषद क्षेत्रात विविध पद भूषवित आपल्या कार्याने यवतमाळकरांची मने जिंकली. शून्यातून प्रगती करत आजच्या युवापिढीपूढे नवा आदर्श निर्माण केला आहे. कोणतेही क्षेत्र असो लहान मोठे न मानता सच्च्या मनाने कार्य केले की यश मिळते, हे त्यांनी दाखवून दिले.
बाळासाहेबांची राजकीय कारकिर्द
१९८९ ते १९९२ : सरपंच, ग्रामपंचायत भारी
१९९२ ते १९९७ : सभापती, पंचायत समिती यवतमाळ
१९९७ ते २०१७ : सतत विस वर्ष जिल्हा परिषद सदस्य व पुढील पदे भूषविली
१९९७ ते १९९८ : उपाध्यक्ष, यवतमाळ
२००७ ते २००९ : सभापती बांधकाम जि. प. यवतमाळ
२०१५ ते २०१७ : उपाध्यक्ष, जि. प. यवतमाळ
१९९३ ते १९९७ : संचालक कृ.उ.बा.स. यवतमाळ
१९९८ ते २००१ सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी
• मराठवाडा विद्यापिठ नाव औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नांव देण्यासाठी ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी १९९४ या कालावधीत ०७ दिवस आमरण उपोषणमध्ये सहभाग.
• उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा कबड्डी संघ, अध्यक्ष जवाहर प्रतिष्ठाण यवतमाळ, संचालक, प्रिय दर्शनी सह. सुतगिरणी, यवतमाळ, संचालक विद्याप्रसारक मंडळ, यवतमाळ, संचालक हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ यवतमाळ, चार राष्ट्रीय कबड्डी सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व, चार राज्य कुस्ती सामन्यामध्ये प्रतिनिधीत्व.
‘बाळासाहेब’ द ब्रॅण्ड नेम
यवतमाळ उद्योग नव्हेतर शैक्षणिकदृष्ट्यादेखील मागास शहर, शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिध्द असलेला जिल्हा. जिल्ह्यात पुसद वगळता इतर तालुक्यात शिक्षणाच्या जेमतेम सोयी. जिल्ह्याचे ठिकाणही फारसे प्रगत नाही. अशा जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात नाव उमटविणे मोठ्या जिगरीचे काम त्यांना ठरले. यासाठी त्यांनी सच्चा मनाने नागरिकांची मने जिंकत आपल्या नावाचे ‘ब्रॅण्डनेम’ बनविले.
बाळासाहेबांना यांनी दिली साथ
त्यांच्या राजकीय क्षेत्रात मदतीचा मौलीक वाटा आहे तो दर्डा परिवाराचा. प्रत्येक व्यक्तीनी वेळावेळी त्यांना मदत केली. या मदतीतूनच त्यांना पुढील जिवनासाठी प्रेरणा मिळाली व यातून त्यांनी संधीचे सोने केले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
संघर्षातून मिळालेले यश प्रत्येकाला पचविता येत नाही. त्यासाठी जिद्द व मेहनतीची आवश्यकता असते. यश मिळण्यासाठी कोणत्याही शॉटकर्ट पध्दतीचा अवलंबू करू नका. नाव कमविल्याशिवाय नाव मोठे होत नाही. त्यामुळे कार्य असे करा की तुमचे नाव चार व्यक्तीत चांगल्या कार्यासाठी घेतल्या गेले पाहिजे. जिवन जगताना अडचणी येतात, अनेक अडथळे येतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यातून हार न मानता पुनश्च कष्टाने कामाला लागता. संधी मिळताच संधीचे सोने करा, असा मौलीक संदेश देखील त्यांनी आजच्या युवापिढीला दिला.
– बाळासाहेब मांगूळकर,
माजी सभापती, जिल्हा परिषद, यवतमाळ
– जितेश नावडे, संपादक दि. रिपब्लीक न्यूज (पोर्टल)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here