Home Breaking News खासगी रुग्णालयात मध्यरात्री तपासणीसाठी परवानगी द्यावी : रा. काँ.

खासगी रुग्णालयात मध्यरात्री तपासणीसाठी परवानगी द्यावी : रा. काँ.

95
0

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून खासगी रुग्णालयांमध्ये मध्यरात्री रुग्णाला परवानगी मिळण्यात यावी, या मागणीचे निवेदन १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच ९ सप्टेंबर रोजी विना उपचाराअभावी यवतमाळ येथील एका नामांकित डॉक्टरचा मुत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एक डॉक्टर रुग्ण म्हणून दवाखान्यात येत असेल आणि त्याला कोरोना प्रादुर्भाव अभावी उपचारार्थ उपचारासाठी मदत मिळत नसेल तर ही फार दुर्देवी बाब आहे. डॉक्टरांचीच ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवावी, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गाची भीती ही नागरिकांच्या मनात मानसिक रोग म्हणून निर्माण करून गेली. या अनुषंगाने शहरातील खासगी दवाखान्यांना सूचना देऊन मध्यरात्री रुग्णांना होणारा त्रास बघून उपचारासाठी दाखल करण्याची सूचना द्यावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना देण्यात आले. यावेळी गौरव कदम, संकेत लांबट, शेखर सरकटे, वेदांत बोरखडे, गौरव काळे, राहुल भानावत, अक्षय गरूड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here