Home Breaking News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

47
0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ही माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली. मंगळवारी मला थकवा जाणवत होता. मी माझ्या डॉक्टरला संपर्क साधला. त्यानंतर मी कोरोनाची तपासणी केली. त्यात माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मला आता बरे वाटत असून स्वत:हून विलगीकरणात ठेवले आहे. जे माझ्या संपर्कात आलेले असतील त्यांनी आपली तपासणी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यापूर्वी क्रीडा मंत्री सुनील केदार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत व गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित आढळले होते. महापौर संदीप जोशी यांनी स्वत:ला विलगीकरण करून घेतले होते. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here