Home Breaking News डॉक्टरांकडून रुग्णांची हेळसांड : संभाजी ब्रिगेड

डॉक्टरांकडून रुग्णांची हेळसांड : संभाजी ब्रिगेड

236
0

जिल्हाधिका-यांनी सुनावले खडेबोल; संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल

यवतमाळ : शहरात एका खाजगी डॉक्टराचा उपचाराअभावी मृत्यू होणे ही एक शोकांतिका ठरली आहे. असे असताना आदिवासी बहूल जिल्ह्यातील गरिब, शेतकरी, शेतमजूर, रोजमजूरी करणाऱ्या गरीब रुग्णाला विविध चाचण्या सांगूण पैसे उकळीत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्यावतीने 14 सप्टेंबरला जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. शिवाय इतर आजारांवरही दूर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिका-यांनी नुकतेच खासगी व शासकीय डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे जनसामान्यांत यवतमाळचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून नावरुपास आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात जिल्ह्यातील शासकीय व खाजगी डॉक्टरांकडून इतर आजारांवर दूर्लक्ष होत आहे. या गंभीर बाबीची दखल घेत संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रगडे यांनी जिल्हाधिकारी उपाययोजना करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. कोरोना पार्श्वभुमीवर इतर आजारांवर दुर्लक्ष होत असल्यामुळे बरेचसे रुग्ण दगावत आहे. या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी तातडीने बैठक घेऊन सर्व खासगी व शासकीय डॉक्टरांची झाडाझडती घेतली आहे. यामुळे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, जिल्हा निरीक्षक अनिकेत मेश्राम, शुभम पातोडे, सचिन मनोहर, सुरज पाटील, निहार घाडगे, सरफराज खान, किशोर ठाकरे, प्रशांत ठाकरे, विनोद चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here