Home Breaking News तिवरंग येथील अनेकांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

तिवरंग येथील अनेकांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

50
0

महागाव : तालुक्यातील तिवरंग येथील नागरिक, युवक, महिला आदींसह अनेकांनी नुकताच रा. काँ. पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष ख्वॉजा बेग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मनोहरराव नाईक, नानाभाऊ गाडबैले, आमदार इंद्रनील नाईक, तालुका अध्यक्ष सिताराम ठाकरे, दौलत नाईक, साहेबराव पाटील, संदीप ठाकरे, स्वप्नील अडकीने यांचे मार्गदर्शन लाभले.

तिवरंग येथील गुणवंत राठोड यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करण्यात आला. त्यांनी पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारावर प्रेरीत होऊन पक्ष प्रवेश करण्याचा निश्‍चय केला होता. यावेळी मतीन शेख यांनीही प्रवेश केला. जिल्हा महिला अध्यक्ष क्रांती राऊत, महागाव तालुक्यातील जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील,  पं. स. सदस्य संदीप पाटील, तालुका अध्यक्ष हरीश कुडे, योगेश धानोरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here