Home Breaking News दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात

दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात

137
0
48 तासात 17 मृत्यु ; 354 नव्याने पॉझेटिव्ह
यवतमाळ, दि. 18 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 548 जण गत दोन दिवसांत बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात गुरुवारी 114 जण तर शुक्रवारी 434 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गत 48 तासात जिल्ह्यात एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पहिल्या 24 तासात सात जण तर दुस-या 24 तासात 10 जणांचा समावेश आहे. तसेच दोन्ही दिवसात जिल्ह्यात एकूण 354 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.
पहिल्या 24 तासात मृत झालेल्या सात जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, 52 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर दुस-या 24 तासात मृत झालेल्या 10 जणांमध्ये यवतमाळ शहरातील 37 वर्षीय दोन पुरुष, 48 वर्षीय, 64 वर्षीय आणि तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष, झरी जामणी शहरातील 60 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 52 वर्षीय पुरुष आणि जिल्ह्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. गत 48 तासात जिल्ह्यात 354 जण नव्याने पॉझेाटिव्ह आले असून यात 215 पुरुष आणि 139 महिला आहेत.
गत 24 तासात पॉझेटिव्ह आलेल्या 182 जणांमध्ये 114 पुरुष आणि 68 महिला आहेत. यात आर्णी शहरातील दोन पुरुष, आर्णी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरुष व दोन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व तीन महिला, दारव्हा शहरातील आठ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील पाच पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व तीन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, मंगरूळपीर शहरातील एक पुरुष, मारेगाव शहरातील एक पुरुष व तीन महिला, मारेगाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील 10 पुरुष व सहा महिला, नेर तालुक्यातील दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील 15 पुरुष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व आठ महिला, वणी शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील 31 पुरुष व 22 महिलांचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1234 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 389 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 6754 झाली आहे. यापैकी 4939 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 303 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 65685 नमुने पाठविले असून यापैकी 64565 प्राप्त तर 1120 अप्राप्त आहेत. तसेच 57811 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here