Home Breaking News लंपी स्कीन आजारग्रस्त जनावरांवर औषधोपचार करण्याची मागणी

लंपी स्कीन आजारग्रस्त जनावरांवर औषधोपचार करण्याची मागणी

49
0

घाटंजी तहसीलदारांना गवळी समाज संघटनेचे निवेदन

घाटंजी:  तालुक्यातील मांडवा, राजेगाव, साखरा,  मारेगाव आदी गावामध्ये  काही दिवसांपासुन गायी, म्हशी व ईतर जनावरांवर लंपी स्किन त्वचा आजार मोठ्या प्रमाणात आढळूण येत आहे. त्यामुळे अनेक जनावरे दगावली जात आहे. परिणामी, शेतकरी वर्गासह, दुधाचा व्‍यवसाय करणा-यांना आर्थिक फटका बसत आहे. परिणामी, उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा आहे. गावातील आजारग्रस्त गायी, म्हशींची तपासणी करण्यासंदर्भात गवळी समाज संघटनेने १५ सप्टेंबर रोजी घाटंजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
घाटंजी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शेतक-यांचा शेतीसह, जोडधंदा असलेल्या दुग्धव्‍यवसायाकडे प्रामुख्याने कल आहे. जनावरांवरील लंपी स्कीन आजारांमुळे जनावरे दगावली जात आहे. आजारग्रस्त जनावरांमध्ये दुधाचे प्रमाण  कमी प्रमाणात येत असल्यामुळे चिंतेची बाब ठरत आहे. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन अधिका-यांनी प्रत्येक गावात शिबिरे घेऊन औषधोपचारासह जनावरांची तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत उपाययोजना करण्यात यावी या उद्देशाने  गवळी समाज संघटनेच्या कार्यकारिणीतर्फे तहसीलदार पुजा माटोडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना  यादव घोडे , तुकाराम चेके, श्रीकांत घोडे, अरुण अरबट, गोविंदा कालोकार, भाऊरावजी घाटोळ, नंदू भोंगाडे  आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here