Home Breaking News दिलीप भुजबळ पाटील जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक

दिलीप भुजबळ पाटील जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक

88
0
यवतमाळ : बुलडाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांची यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याची वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान नवे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्यासमोर राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत होत्या. त्यामुळे पोलिस दलातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र नुकतेच गृह विभागाकडून पोलिस अधीक्षकांच्या बदल्या केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here