Home यवतमाळ साहसी तरुणांचा गौरव

साहसी तरुणांचा गौरव

42
0

घाटंजी तिरळी कुणबी संघटनेचा पुढाकार, इतरांनी आदर्श घेण्याची आवश्‍यकता

घाटंजी: आपण समाजाचे काही देने लागतो  या भावनेतून काम करणारी माणस अजूनही समाजात आहे म्हणायला हरकत नाही.अशाच दोन घटना घाटंजी परिसरात घडल्या. प्रसंगावधान राखत जिवाची बाजी लावत नवनीत भोयर  व मोरेश्वर बारहाते या साहसी तरुणांनी दोन व्यक्तीचे प्राण वाचविले. अशा साहसी कार्याचा गौरव व्हावा व त्यांनी केलेल्या कार्याची इतरांनी प्रेरणा घ्यावी , या उद्देशाने घाटंजी तालुका तिरळी कुणबी संघटनेच्या वतीने  नवनीत भोयर, मोरेश्‍वर बारहाते यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि भेटवस्तु देऊन नुकताच सत्कार कऱण्यात आला
वाघाडी नदीवर सूर्य ग्रहनाच्या दुसऱ्या दिवशी आंघोळ करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाय पाण्यात घसरल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला होता .  वेळीच प्रसंगवधान राखुन  खापरी येथील एक साहसी तरुण नवनीत तानबाजी भोयर याने एका क्षणाचाही विलंब न करता पाण्यात तात्काळ उडी मारली व प्रयत्नांची पराकाष्टा करून त्या व्यक्तीला वाचविण्यात यश मिळाले.
दुसरी घटना येळाबारा येथील वाघाडी धरणावरील नैसगिर्क रित्या निर्माण झालेल्या धबधब्या वरची आहे.सध्या येथील धबधबा तरुणाईला आकर्षित करीत आहे.धबधब्याचा आनंद लुटनन्यासाठी गेलेले साखरा ता. घाटंजी येथील तीन तरुण सेल्फीच्या नादात खोल पाण्यात पडले आणि बुडू लागले प्रसंगवधान राखून येळाबारा येथील तरुण मोरेश्वर संजयराव बारहाते याने तात्काळ पाण्यात उडी मारून तीन पैकी एका तरुणाला वाचविण्यात यश मिळविले. येळाबारा येथील अर्जुन पोयाम, गजानन कोडापे,  अविनाश जगताप,  रोशन डंभारे, दिनेश उमरे, हे ध्येयवेडे तरुण तर नेहमीच संकटाच्या काळात पुढे येऊन काम करतात, त्यांनी केलेल्या साहसी कार्याचा गौरव व्हावा यासाठी घाटंजी तालुका तिरळी कुणबी संघटनेच्यावतीने त्यांचा शाल श्रीफळ मानपत्र आणि भेटवस्तु देऊन सत्कार कऱण्यात आला. यावेळी मोरेश्वर वातीले, शैलेश इंगोले, सुभाष चौधरी, अमोल ढगले, आशिष भोयर, अनिल गावंडे, प्रशांत अवचित, विकास डंभारे, जीवन डंभारे आदी उपस्थित होते,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here