Home Breaking News अन्‌! अवघ्या काही क्षणातच स्वप्नाचा चुराडा

अन्‌! अवघ्या काही क्षणातच स्वप्नाचा चुराडा

169
0
शेतात  वीज कोसळल्याने कपाशी जळून खाक; आर्थिक मदतीची मागणी
यवतमाळ : व्याजाने पैसे काढून आडीची दिडी करून जमीन कसली. बियाणे पेरले. बियाण्याचे अंकूर फुलले. फुलण्याआधीच निसर्गाचा प्रकोप झाला. अन्‌ कर्जाचा डोंगर उभा राहिला. क्षणार्धात चिमुरड्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न डोळ्यासमोर आला. अशी अवस्था झाली आहे ती सुकळी येथील शेतकऱ्याची. त्याच्या शेतात 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.15 मी. वीज कोसळली. वीज कोसळल्याने त्याने मुलाबाळासारख्या फुलवल्या कपाशीचा सत्यानास झाला. प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
तालुक्यातील सुकळी गावात सदाशिव काळू जगताप यांच्या शेतात 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.15 मी. वीज कोसळली. यात कपाशी पुर्ण जळून खाक झाली. अगोदरच व्याजाने पैसे काडुन शेती केली. त्यात अर्धा एकर पूर्ण कपाशी वाया गेली. त्याला  50हजार खर्च आला. त्यात निसर्गाने साथ नाही दिली आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न पडला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी ,  अशी रास्त मागणी शेतकऱ्याने केली आहे.
कर्जाची परतफेड कशी करू : जगताप
वेळप्रसंगी पत्नीचे दागिने गहाणही ठेवायला मागे पूढे न पाहणारा शेतकरी मेटाकूटीस येण्याची बाब जिल्ह्यात नित्याचीच झाली आहे. मातीत घाम गाळून कष्टाने उभारलेले पीक वीज कोसळल्याने क्षणार्धात मातीमोल झाले आहे. शेती पिकवावी की नाही, दरवर्षी नवनवीन संकटावरून विवंचनेत पडलो आहे, अशी प्रतिक्रीया सुकळी येथील शेतकरी सदाशिव जगताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here