Home Breaking News जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु

जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु

95
0
 215 नव्याने पॉझेटिव्ह ; 230 जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गत 24 तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 230 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 31 वर्षीय, 46 वर्षीय, 56 वर्षीय आणि 17 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 19 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 50 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 56 वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील 57 तसेच 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 135 पुरुष व 80 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 33 पुरुष व 16 महिला, यवतमाळ तालुक्यातील चार पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील 10 पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील 12 पुरुष व आठ महिला, कळंब शहरातील 11 पुरुष व 10 महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील 13 पुरुष व आठ महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, घाटंजी शहरातील पाच पुरुष व पाच महिला, केळापूर तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील सहा पुरुष व एक महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील सहा पुरुष व सात महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व दोन महिला, राळेगाव शहरातील एक महिला, राळेगाव तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील नऊ पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 530 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 702 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7841 झाली आहे. यापैकी 6370 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 239 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 272 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 70404 नमुने पाठविले असून यापैकी 69607 प्राप्त तर 797 अप्राप्त आहेत. तसेच 61766 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here