Home Breaking News अन् कपाशीच्या बोंडाची झाली माती….

अन् कपाशीच्या बोंडाची झाली माती….

156
0
शेतकरी महिलेचे एसपींना साकडे; ऐन बहरलेल्या कापसाची माती, नुकसान भरपाई कोण देणार?
योगेश दहेकर
मांगलादेवी : कर्ज काढले. वेळप्रसंगी दागिने गहाण ठेवत बियाणे घेतले. जमीन कसली. दिवसरात्र घाम गाळून कपाशी उभी झाली. कपाशी फुलू लागली. कपाशीची बोंडे बोलू लागली. अशातच फुललेल्या कपाशीची बोंडे उपडून अज्ञात व्यक्तीने कमविलेल्या श्रमाची माती केली. मांगलादेवी येथील एका शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने तो हताश होऊन संबंधित तक्रारीबाबत यवतमाळ एसपींना निवेदन दिले. शिवाय, नुकसानभरपाईची देखील मागणी केली आहे. संबंधित घटनेवरून आता फुललेली कपाशी शेतशिवारात सुरक्षीत नसल्याचे दिसून येत आहे.
नेर तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी दिलीप नागोराव मोडक यांचे गटनंबर 100 ही जवळपास साडेतीन एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी यावर्षी कापूस व तुर पिकाची लागवड केलेली आहे .चांगला पाऊस आणि व्यवस्थित निगा राखल्याने कापूस आणि तुरीचे पीक जोमदार आले आहे. परंतु, कुण्यातरी अज्ञात इसमाची नजर ही त्यांच्या पिकावर पडल्याने सदर शेतकऱ्याची बोंडाने लबदलेली जवळपास आतापर्यंत आठशे झाडे उपटून फेकलेली आहे. यापूर्वी दिनांक 4 सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतातील तुर आणि कापसाची जवळपास 400 झाडे उपटून फेकली होती. याची तक्रार त्यांनी पोलीस प्रशासनाला दिली होती. सदर शेतकऱ्यांचे कुटुंब सहा व्यक्तींचे असून त्यांचे जगण्याचे मुख्य साधन हे शेती आहे. त्यांना अविवाहित तीन मुली व एक मुलगा आहे. मुलींच्या लग्नाची चिंता आणि जगण्याची चिंता या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर अज्ञात व्यक्तीने शेतातील हातातोंडाशी आलेले पीक उपटून फेकले. त्यामुळे जगण्याचे संकट उभे झाले आहे.

मला तीन मुली व एक मुलगा आहे. माझे जीवन शेतीवर अवलंबून आहे .दिनांक 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची योग्य चौकशी आणि आरोपीचा योग्य तपास करून, प्रशासनाची योग्य कारवाई झाली असती तर हा प्रकार दुसऱ्यांना घडला नसता. यात सर्वस्वी प्रशासन दोषी आहे.
-दिलीप नागोराव मोडक, शेतकरी .मांगलादेवी ता. नेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here