Home Breaking News कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी; राष्ट्रवादी युवक, युवती काँग्रेसची मागणी

कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी; राष्ट्रवादी युवक, युवती काँग्रेसची मागणी

38
0
यवतमाळ : राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने देशाचे पंतप्रधान यांना पोस्टाव्दारे कांदा भेट देऊन निवेदन देण्यात आले, केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेस व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पोस्टाव्दारे कांदे भेट देवुन निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आशिष मानकर, शहर अध्यक्ष शेखर सरकठे, यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुका अध्यक्ष दक्षता डंभारे, पांढरकवडा युवती तालुका अध्यक्ष शीतल कुरठकर, संकेत लांबट, वेदांत बोरखडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here