Home Breaking News अभ्यासिका ठरणार अधिकारी निर्माणाचा रामसेतू

अभ्यासिका ठरणार अधिकारी निर्माणाचा रामसेतू

37
0

गाव तिथे अधिकारी संकल्पना : जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचा उपक्रम

उमरखेड : गाव तिथे अधिकारी ही संकल्पना हाती घेण्यात आली आहे. त्याकरिता अभ्यासिका सुरू केली असून, यातून अधिकारी निर्माणाचा रामसेतू साकारला जाणार आहे. गाव तेथे अधिकारी हा पथदर्शी प्रकल्प संस्थेच्या वतीने उमरखेड व महागाव तालुक्‍यात सुरू करण्यात आला आहे.
उमरखेड तालुक्‍यातील पोफाळी, साखरा आणि चातारी येथे पहिल्या अभ्यासिकेचे उद्घाटन अध्यक्ष तातू देशमुख व जिल्हा परिषद अर्थ- बांधकाम सभापती राम देवसरकर यांचे हस्ते करण्यात आले. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात निःशुल्क अभ्यासिका उभारून शैक्षणिक चळवळ बळकट करण्याचे काम यामाध्यमातून केले जाणार आहे. शैक्षणिक इतिहासात क्रांती करणार्‍या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. अनेक तरुणांना अभ्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राम देवसरकर यांनी ग्रामीण भागातील विद्याथ्यांसाठी गाव तेथे अधिकारी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीतच प्रत्यक्षात आणला. विशेष म्हणजे काही तरुणांनी स्वयंप्रेरणेने संपर्क साधत अभ्यासिका उभरणेबाबत विनंती केली. त्यांचे मागणीनुसार लवकरच अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, चित्तांगराव कदम, सभापती बाळासाहेब चंद्रे, रमेशराव चव्हाण, युवराज देवसरकर, विठ्ठलराव चव्हाण, बाळासाहेब सुरोशे, डॉ. आनंद कदम, नारायण मोरे, गजानन सोळंके, किसनराव वानखेडे, अतुल पाटील, अनंता कनवाळे, उत्तमराव कनवाळे, विलास मोरे, सतीश नाईक, विलास चव्हाण, दयाराम ‘पाटील, कैलास शिंदे, श्यामराव वानखेडे, गणेश बेले, डॉ. कल्याण राणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here