Home Breaking News खरीप हंगामातील कापूस, सोयाबिन धोक्यात

खरीप हंगामातील कापूस, सोयाबिन धोक्यात

45
0
घाटंजी : सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीनची पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
तालुक्‍यात एकुण ६३ हजार ५०० एकर शेतजमीन वहितीखाली आहे. मुख्य पिक कापूस व सोयाबीन असून, त्याचीच अधिक लागवड होते. कापूस हे अधिक खर्चाचे पिक असल्याने शेतकरी सोयाबीन पिकाकडे अधिक वळले आहे. गत पंधरवाड्यापासून सततच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे सोयाबिनच्या शेंगाला कोंब फुटले तर पऱ्हाटीची बोंड सडली आहे. तालुक्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असून पावसाची रिपरिप सुरुच असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी तालुक्‍यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस झाल्याने पीके जोमात होती. मात्र त्यानंतर ढगाळी वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.  उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here