Home Breaking News युनीयन बँकेसमोर शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

युनीयन बँकेसमोर शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

24
0
मुडाणा : स्थानिक युनियन बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे.
महागाव तालुक्‍यातील मुडाणा परिसरातील शेतकर्‍यांसाठी युनियन बँक असून, सदर बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन सुरळीत कर्जपुरवठा होत नाही. कागदपत्रे, स्टँम्प देऊन एक-एक महिना बँक फिरवित आहे. मंजूर झालेल्या कर्जप्रकरणाचे पैसे खात्यावर वेळेत जमा न करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीचे उत्तरे मिळत असल्याने शेतकरी वैतागले आहे. आता या बँकेच्या  शेतकरी व मार्क्सवादी पक्षाचे कार्यकर्ते डी. बी. नाईक, देविदास मोहकर यांच्यासह शेकडो शेतकरी तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहे. परंतु, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आज शुक्रवारी बँकेसमोर हायवे रोडवर डी. बी. नाईक यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी भीक मांगो आंदोलनास सुरूवात केली आहे. दरम्यान, शनिवारी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here