Home Breaking News शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न निकाली काढा

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न निकाली काढा

25
0
आंदोलनाचा इशारा : दारव्हा तालुका काँग्रेस, रा. काँ., शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
दारव्‍हा : तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महाविकास आघाडी घटक पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी,यांचे वतीने, महामहीम राष्ट्रपती भारत सरकार, यांना कृषी विधेयके प्रवर समितीकडे पाठविण्या बाबत,दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करुन अति पावसामुळे सोयाबिन, कापुस, उडीद मुंग पिकांना त्वरीत नुकसान भरपाई देण्या बाबत, तालुक्यातील महावितरण पारेषण कंपनी कडुन कोरोना  ताळेबंदीच्या कालावधीतील नागरिकांचे, घरगुती ग्राहकांचे थकीत विज बिल संपूर्ण माफ करण्याबाबत,   तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणुका घेण्याबाबत, मा.मुख्यमंत्री म.राज्य, निवडणूक आयोग, यांच्याकडे मागणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांच्या कार्यालयावर धडक देवून निवेदन सादर करण्यात आले.
  केंन्द्र सरकारनी आवाजी मतदानाने सर्व सांसदीय संकेत पायदळी तुडवून दि.२०/९/०२०रोजी राज्यसभेत पारीत केलेले तिनही विधेयक नाकारुन सविस्तर चर्चेसाठी प्रवर समितीकडे सिलेक्ट (कमिटी) पाठवा, कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन,सुलभिकरण) कृषी सेवा करार विधेयक २०२०,शेतकरी सशक्तीकरण संरक्षण किमंती बाबत आश्वासन, हे तिन विधेयके पारित करण्यात आली. हि विधेयके शेतकरी हिताचे असल्याचे भासविण्यात आले.प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणा-या कृषी उत्पन्न बाजार समित्यासाठी हे विधेयक मुत्युलेख आहे.पंजाब, हरियाणा सह देशभरातील शेतकरी या विधेयकाविरोधात गेले आहेत.या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करु नये, शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्याविषयी असलेल्या अन्यायकारक तरतुदी वगळाव्या अशी मागणी या निवेदनातुन राष्ट्रपती महोदयांना करण्यात आली.  शिवाय दारव्हा तालुक्यात  २०ते२५ दिवसापासुन भरपुर प्रमाणात सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे सोयाबिन, कापुस, उडीद, मुंगाची पिके उध्दवस्त झाली आहे. कोरोना संकटामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, सुरुवातीला अपु-या पावसामुळे आणि सोयाबिन बियाणे नित्कृष्ट दर्जोचे निघाल्याने शेतकरयांना दुबार तिबार पेरणी करावी लागली, या समस्येतून शेतकरी सावरत असतानाच सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, सोयाबिन च्या सेंगांना सोगंण्या आधीच कोंब फुटायला सुरुवात झाली आहे.पावसामुळे कपाशीचे बोंड सुध्दा सडत आहे.उडीद,मुंगाची पिके तर संपूर्णच उध्दवस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करुन सोयाबिन, कापुस, उडीद, मूंग पिकाचे शासनाने शेताचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी. राज्याचे उर्जोमंत्री मा.ना.नितिनजी राऊत यांनी कोरोना १९ च्या कालावधीतील घरगुती विज बिल माफ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु, महावितरण कंपनीच्या माध्यमातून विज ग्राहकांना बेधडक विजेचे बिल पाठवुन अधिकारी, कर्मचारी, यांच्या कडुन शक्तीने विज बिल भरुन घेत आहेत, अन्यथा तुमचा वि्‍द्‍युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे, तेव्हा मा.मुख्यमंत्री महोदयांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही विज ग्राहकांकडून विज बिल भरण्याची सक्ती करु नये. कोरोनाच्या ताळेबंदी कालावधीतील संपूर्ण घरगुती विज ग्राहकांचे विज बिल माफ करण्याचे आदेश काढुन विज ग्राहकांना दिलासा द्यावा,ही मागणी केली आहे. सोबतच दारव्हा तालुक्यातील मुदत संपलेल्या ३० ग्राम पंचायतीच्या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया मार्च २०२० मध्येच आटोपली असता कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे स्थगित करण्यात येऊन ग्राम पंचायत प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्ती केल्या. त्यानंतर मुदत संपलेल्या उर्वरित ४८ग्रा.पंचायतीवर प्रशासक म्हणून जि.प.चे मुख्याध्यापक यांना नियुक्त केले. ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोग म.राज्य   यांच्याकडे केली असुन या वरील सर्व मागण्याचा  निवेदनातुन  त्वरित विचार  व्हावा अन्यथा दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महाविकास आघाडी, घटक पक्ष शेतकरी, शेतमजुर, सामान्य नागरिक यांच्या वतीने  आंदोलन करणार असल्याचा इशारा,  उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना प्रकाश नवरंगे अध्यक्ष दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी, प्रा,चरण पवार अध्यक्ष दारव्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सै फारुक सै.करिम उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, अमोल राठोड मा.सभापती जि.प.यवतमाळ, मनमोहनसिंग चव्हान, रामधन जाधव अध्यक्ष दारव्हा तालुका सेवादल काँग्रेस, राजेंद्र घाटे सचिव यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी,नासिर शेख अध्यक्ष दारव्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस, विश्र्वासराव ठाकरे, ज्ञानेश्वर कदम, अतुल ठाकरे सचिव युवक काँग्रेस, निलेश बोरकर सचिव जिल्हा युवक काँग्रेस, अनिल मोहिते, विजय गोकुळे,महेमुद अली,राजु राठोड, सर्फराज खान, कैलास साबळे अध्यक्ष दारव्हा तालुका सोशल मिडिया,शेख मुस्ताफ पटेल, दिगांबर गायकवाड, एजाज खान, कैलास बोरचाटे, राहुल चेटुले,बाबाराव राऊत, वसंतराव सवाई, संतोष फुसांडे, मधुकरराव राठोड, रमेशराव पचगाडे, रघुनाथ डहाके, शंकरराव देशकरी, एजाज खान जमा खान,नवेद खाॅ, अनिल लोथे,राजु अवचट,लखन राठोड,अतुल धोटे,नेमिचंद आडे,शतिष बागल, हंसराज जाधव,विष्णु शिंदे,शुरेश डोलारकर,दादाराव बुरांडे, श्रीकृष्ण मोरे, अनिल महल्ले, भाऊराव राठोड, वसंतराव बोरचाटे, महेश राठोड,प्रकाश चव्हाण, गजानन भुसे, गजानन वाडेकर, अहेमदखाँ  सुभानखाँ, तुळशीराम कांबळे, विजय राठोड, वामन पवार, महादेव कचरे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here