Home Breaking News उद्गम फाउंडेशनतर्फे गरजूंना अन्नधान्य

उद्गम फाउंडेशनतर्फे गरजूंना अन्नधान्य

62
0
प्रतिनिधी/सोहेल चव्हाण
पुसद : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ताळेबंदी घोषित करण्यात आली होती. परिणामी, अनेकांचे हाताचे काम गेले. बेरोजगारी वाढली. गरजूंसाठी अन्ननदान देऊन मदतीचा हात पुढे करत उद्गम फाऊंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासली. पुसद येथील शिवाजी वॉर्ड येथील गरजूंना 26 सप्टेंबर रोजी किराणा वाटप करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अनिता नाईक, सचिव सोनल ययाती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा धान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी उद्गम फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र राठोड, प्रजापती, सदस्य डॉ. कुणाल चव्हाण आणि अरविंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here