Home Breaking News बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष पदी युवराज मोहाडे

बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष पदी युवराज मोहाडे

383
0
दारव्हा – तालुक्यातील सांगवी रेल्वे येथील सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले युवराज दिपक मोहाडे यांची बिरसा क्रांती दल संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
हे संघटन आदिवासी समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी ,आत्मसन्मान, अस्तित्व, अस्मिता, संरक्षण आणि शिस्त, शिक्षण, व संस्कृती संवर्धनासाठी वैचारिक व कँडरबेस पातळीवर काम करीत आहे. त्यांनी विविध कार्यात सातत्याने पुढाकार घेतला आहे. यापुढेही संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचा त्यांचा मानस आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, महासचिव प्रमोद घोडाम, राज्य उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके,जिल्हा महासचिव प्रफुल कोवे यांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here