Home Breaking News उत्तम आरोग्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

उत्तम आरोग्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

37
0

हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ तर्फे आयोजन

यवतमाळ : केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय द्वारा व हॉकी इंडिया च्या पुढाकाराने फिट इंडिया फ्रीडम रन हा कार्यक्रम 15 ते 25 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात आला. यात जिल्ह्यातील अनेक युवांनी कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. उत्तम आरोग्य मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला व्यायामाची आवश्यकता असते, याच उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरांमध्ये हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयोजनाने 15 सप्टेंबर ला उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक दाते प्रा. डॉ. राजेंद्र क्षीरसागर हॉकी असोसिएशनच्या सचिव मनिषा आकरे प्रीतम शहाडे ,अभिजित पवार, अक्षय शहाडे, धनराज झोंबडे, सुशील बागडे तर 25 सप्टेंबर रोजी झालेल्या या समारोपीय कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून हॉकी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष अनिल नायडू प्रमुख अतिथी म्हणून प्रा. निलेश भगत, तालुका क्रीडा संयोजक राहुल ढोणे, सचिव मनिषा आकरे, किरण फुलझेले, नागेश गोरख, गिरीराज गुप्ता, अक्षय शहाडे, प्रीतम शहाडे, आजी व माजी खेळाडू उपस्थित होते. फिट इंडिया फ्रीडम या अंतर्गत कोणीही कोठेही धावा व फिटनेस वाढवा असा संदेश देण्यात आला आणि तो संदेश नेहमीसाठी तुम्ही फिट रहा. 150 व्या महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम पूर्ण भारतात राबवण्यात आला होता. त्या अनुषंगाने आपण आपल्या धावण्याचा व चालण्याचा व्हिडिओ काडून संबंधित हॉकी असोसिएशनच्या वेबसाईटवर अपलोड करायचा होता. उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अभिजित पवार, प्रास्ताविक मनीषा आकरे यांनी तर आभार प्रीतम शहाडे, अक्षय शहाडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉकी खेळाडूंनी पुढाकार घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here