Home Breaking News आरक्षणासाठी धनगर समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

आरक्षणासाठी धनगर समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

146
0
युवा धनगर समाजाचे जिल्हाधिका-यांना निवेदन : मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
यवतमाळ : महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव गेल्या ७० वर्षा पासून एस. टी. आरक्षणा पासून वंचित आहे. धनगर समाज हा आदिवासी पेक्षाही खालच्या स्तराचे जीवन जगात आहे. त्यांची मुले शिक्षण व नौकरी पासून वंचित आहेत. राज्यघटनेनुसार धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत आहे. या सर्व बाबीचा विचार करून धनगर समाजाची एस. टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी,  मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनात करण्या येईल, असा इशारा युवा धनगर समाजातर्फे ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
गेल्या ७० वर्षापासून शांततेच्या मार्गाने हा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु सर्वच सरकारनी आमची मागणी नामंजूर केली. तातडिने मागणी निकाली काढण्यासाठी वारंवार प्रशासनाला निवेदने तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, अजूनही प्रशासनाला घाम फुटलेला नाही. आता उपाययोजना करण्यात आल्या नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना अविनाश जानकर, विशाल पोले, महेश गोरडे, विठ्ठल बुटले, गजानन मसाळे, राहुल मासाळ, रामचंद्र आडते, अमन कुनगर, चेतन शिंदे, राजू गवळी, चेतन सोननकार, शुभम रुपनर, प्रफुल लोखंडे, एल. एच. आत्राम, एन. एन. इल्कीकर, प्रतिक पोले, सुनील बोदे, उमाकांत गावंडे, उज्ज्वल वानखडे, अविनाश तेलंग, विशाल पोले, गजानन मसाळे, विठ्ठल बुच्चे, योगेश वाघमोडे, मयुर कोळकर, राहुल मासाळ, सागर मस्के, अंकित कुनगर, शिवम खांदवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here