Home Breaking News श्रीरामपूर येथील नालीची साफसफाई केव्हा होणार?

श्रीरामपूर येथील नालीची साफसफाई केव्हा होणार?

41
0
संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ग्रामस्थांचे सचिव व सरपंचांना निवेदन
पुसद/प्रतिनिधी
बातमीदार : सोहेल चव्हाण
श्रीरामपूर येथील प्रभात नगरमधील नाल्यांना अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्याचे पाणी नालीत तुंबल्याने घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. अशा स्थितीत नागरिकांना राहणे अवघड होत आहे. संबंधित ग्रामपंचायतचे विकासकामाकडे दूर्लक्ष असल्याचे, नागरिकांमधून बोलले जात आहे. आधीच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या शेकडोच्या घरातत आहे. अशा स्थितीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुध्द कमालीचा रोष पसरला आहे. परिसरातील नागरिकांनी ग्रामस्थांचे सचिव व सरपंचांना निवेदन नाली स्वच्छता करणेबाबत व नाली बांधकामाबाबत ३० सप्टेंबर रोजी निवेदन दिले आहे.
पुसद तालुक्पायातील श्रीरामपूर येथील प्रभात नगरमधील नागरिकांना अनेक समस्यांना ताोंड द्यावे लागत आहे. पावसाळा असल्याने पावसाचे पाणी नालीत तुंबून भरले आहे. नालीचे बांधकाम व्यवस्थीत नसल्याने नाल्यामध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे. अक्षरश: नालीमध्ये पाणी व कचरा तुंबून भरलेला आहे. त्यामुळे नालीचे पाणी साचलेला आहे. अस्वच्छतेमुळे मच्छरांची संख्या वाढली आहे. परिणामी, नागरिकांना मलेरिया, ताप, डेंगू, निमोनिया आदी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर पुसद व परिसरातील गावांमध्ये वाढतच आहे. त्यामुळे तेथे लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वार्डामध्ये कचरा कुंडीची व्यवस्था नाही. तेथील लोक कुठेही कचरा फेकतात. ग्रामपंचायतकडून अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. वार्डातील नागरिकांनी अनेक वेळा तोंडी व लेखी ग्रामपंचायत श्रीरामपूरला तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली नाही. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना मो. समी मो. इसाल, शाहीद खान पठाण, इम्रान खान, मो. फिरोज मो. इब्राहीम, इरशाद अहेमद अ. वजिद, दिलदार खान पठाण, शेख शे. मब्बुर, मोहीमोद्दीन अजीमोद्दीन शेख, इम्रान बेग मिर्झा, सफीउद्दीन शेख, मजीद खान ठेकेदार आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here