Home Breaking News यवतमाळ जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 46 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 46 जण नव्याने पॉझेटिव्ह

51
0

यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 46 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय व 31 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 54 वर्षीय पुरूष व दारव्हा शहरातील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 26 पुरुष व 20 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील दोन पुरुष व चार महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील पाच पुरुष व चार महिला, पुसद शहरातील तीन पुरुष व पाच महिला आणि उमरखेड शहरातील एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 219 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8583 झाली आहे. जिल्ह्यात 268 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 262 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 75546 नमुने पाठविले असून यापैकी 74785 प्राप्त तर 761 अप्राप्त आहेत. तसेच 66202 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here