Home Breaking News राहुल गांधींना धक्काबुक्कीचा निषेध

राहुल गांधींना धक्काबुक्कीचा निषेध

43
0
काँग्रेस कार्यकर्ते भडकले : योगींचे छायाचित्र जाळले
यवतमाळ : खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे येथे तीत्र पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात निषेध आंदोलन केले. जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि अल्पसंख्यक आघाडीच्या कार्यकर्त्यानी आंदोलन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र जाळण्यात आले. योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नंद्र मोदी यांच्या ‘निषेधाचे नारे देण्यात आले.
हातरस ‘ येथे सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राहुल गांधी घटनास्थळी जाताना त्यांना रोखण्यात आले. यावेळी उत्त प्रदेश पोलिसांनी त्यांना मारहाण केली. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक चंदू चौधरी, विशाल पावडे, वैशाली सवई, जावेद अन्सारी, अरुण ठाकूर, अतुल राऊत, विक्की राऊत, ललित जैन, घनश्याम अत्रे, अनिल गायकवाड, अमोल गुडलवार, रितेश भरूट, मूयुर देसाई, मोसिम खान, छोटू सवई, कुणाल जतकर, अपसर बेग, ओम फुटाने, कृष्णा पुसनाके, मोहन भोयर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here