Home Breaking News जिल्हा काँग्रेसतर्फे ‘किसान, मजदूर बचाव दिवस’

जिल्हा काँग्रेसतर्फे ‘किसान, मजदूर बचाव दिवस’

39
0
कृषी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी; जिल्हा काँग्रेसचे एकदिवसीय धरणे
यवतमाळ :
प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या सुचनेवरून जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २ ऑक्टोबरला आझाद मैदानातील गांधी पुतळ्याजवळ महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्याने ‘किसान मजदूर बचाव दिवस’ पाळला गेला आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन तसेच मोर्चा काढून शेतकरी विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी करणार आहे.
केंद्र सरकारने आवाजी मतदानाने आणि सर्व सांसदीय संकेत पायदळी तुडऊन 20/9/2020 ला राज्यसभेत. कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य (संवर्धन, सुलभीकरण), कृषी सेवा करार विधेयक-2020, शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण किंमतीबाबत आश्वासन ही विधेयके शेतकरी हिताची आहे असे भासऊन पारीत केली. वर्तमान कृषी पणन व्यवस्था (प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समित्या) मोडीत निघून सर्वसाधारण शेतकऱ्यांना व्यापारी, भांडवलदारांच्या पायावर लोळन घ्यावी लागेल. देशात 86% शेतकरी अल्पभूधारक असून त्याची बाजारात तग धरुन राहण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. बाजार समित्यांचे शेतमालाचे बाजारावरील नियंत्रण संपुष्टात येणार असल्याने व्यापारी वर्ग त्याची मोजमापामध्ये तसेच मालाचेच पैसे देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणुक करु शकतात, छोट्या शेतकऱ्यांबाबत असे प्रकार आजही घडतांना दिसतात. नियंत्रण उठवल्यावर तर या सगळ्यांना रानच मोकळे होईल. किराणा विक्री क्षेत्रात उतरणाऱ्या भांडवलदारासाठी वरील विधेयके म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या रक्ताचा सडा शिंपून अंथरलेला गालिचा आहे, अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहेत. त्याचमुळे विरोधकांना चर्चेला पुरेसा वेळ न देता विधेयके कसलीही घाई नसतांना मंजूरीसाठी ठेवली गेली व मंजूरही केली गेली. हे सर्व संशयास्पद आहे. पंजाब, हरियाणासह देशभरातील शेतकरी विरोधात गेले असताना या शेतकरीहित विरोधी विधेयकावर आपण स्वाक्षरी करु नये व लागू केलेले विधेयक त्वरीत मागे घेण्यात यावे. यासाठी जिल्ह्याभर आंदोलन करण्यात येणार आहे. एक दिवसीय धरणे आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रांतध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी आमदार किर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, राहुल ठाकरे, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, पल्लवी रामटेके, जावेद अन्सारी, जिल्हा परिषद गटनेत्या स्वाती येंडे, रवी ढोक, प्रदीप डंभारे, अनिल गायकवाड, घनश्‍याम अत्रे, अरुण ठाकूर, अतुल राऊत, जितेश नावडे, मोहसीन खान, मिनाक्षी सावळकर, रमेश भीसनकर, राजू मेश्राम, क्रिष्णा पुसनाके, ललीत जैन, भास्कर भानारकर, कैलास सुलभेवार, हुसेन खान, ओम फुटाणे, चंदू नंदेश्‍वर, बबली भाई, अशोकराव शिर्के, शिकंदर शहा, गोलू भगत, मुकेश देशभ्रतार, अतुल भूराणे, सुभाष यादव, अजय किन्हीकर, विजय मोघे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here