Home Breaking News हाथरस येथील घटनेचा जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

हाथरस येथील घटनेचा जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

47
0
पीडित मुलीला श्रध्दांजली
यवतमाळ  : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात  २ ऑक्टो. रोजी गांधी व शास्त्री जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा या गावातील दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली व तिचे शव परस्पर जाळून टाकले. या घटनेचा जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे यवतामळ जाहीर निषेध व्यक्त केला. दरम्यान, पिडित अल्पवयीन मुलीला श्रध्दांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे माजी प्रांतध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी आमदार किर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, राहुल ठाकरे, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवाई, पल्लवी रामटेके, जावेद अन्सारी, जिल्हा परिषद गटनेत्या स्वाती येंडे, रवी ढोक, प्रदीप डंभारे, अनिल गायकवाड, घनश्‍याम अत्रे, अरुण ठाकूर, अतुल राऊत, जितेश नावडे, मोहसीन खान, मिनाक्षी सावळकर, रमेश भीसनकर, राजू मेश्राम, क्रिष्णा पुसनाके, ललीत जैन, भास्कर भानारकर, कैलास सुलभेवार, हुसेन खान, ओम फुटाणे, चंदू नंदेश्‍वर, बबली भाई, अशोकराव शिर्के, शिकंदर शहा, गोलू भगत, मुकेश देशभ्रतार, अतुल भूराणे, सुभाष यादव, अजय किन्हीकर, विजय मोघे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here