Home Breaking News एसटी दूचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार; एक गंभीर

एसटी दूचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार; एक गंभीर

58
0

सोहेल चव्‍हाण : पुसद प्रतिनीधी

पुसद : उमरखेड रोडवर कोपरा फाट्याजवळ पुसद आगाराची पुसद- नांदेड या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना अचानक समोर आलेल्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघे तरुण ठार झाले असुन एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

आज सकाळी वाजताच्या दरम्यान पुसदनांदेडकडे बसची कोपरा गावाजवळ सोयाबीन कामाच्या मजुरीसाठी ट्रीपल शीट जाणा-या खडकडरी येथील तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सुशील शिवाजी कु-हाडे (२३) हा जागीच ठार झाला. तर विक्रम पुंजाजी चव्हाण (२३) याने उपजिल्हा रुग्णालयात प्राण सोडले.  रवी अशोक कु-हाडे (२७) या गंभीर जखमी वर उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली.  दरम्यान सकाळी सायकलिंगला गेलेले वाहतूक शाखेचे शेख मकसूद यांना अपघाताचे वृत समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून काही नागरिकांच्या मदतीने जखमी मृतकाना वाहनाखालून काढीत ऑटोद्वारे पुसद रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पुसद शहर पोलीस करीत आहेत. सदर घटनास्थळी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here