Home Breaking News दोषींचे एनकाउंटर करा : संभाजी ब्रिगेड

दोषींचे एनकाउंटर करा : संभाजी ब्रिगेड

164
0
संभाजी ब्रिगेडची मागणी : कळंब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
कळंब : उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा या गावातील दलित कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली व तिचे शव परस्पर जाळून टाकले. या घटनेचा येथील संभाजी ब्रिगेड, ने निषेध करीत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
पीडितेसोबत केलेले कृत्य  हे फार दुर्दैवी आणि समाजाला काळीमा फासणारी आहे . अशा  या घटना समाजात वारंगवार घडत असतांना सुद्धा कुठल्याही प्रकारची कठोर कारवाईची भूमिका मात्र घेतल्या जात नसून फक्त आश्वासने दिली जाते , त्यामुळे या नाराधमांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांना लवकरात लवकर फाशीची किंवा एनकाउंटर करुन ठार मारा,   अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे .  अन्यथा काही दिवसांत पीडितेला न्याय मिळला  नाही , तर तिच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन किंवा मोर्चा करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुका सचिव सम्यक वाघमारे, जिल्हा निरीक्षक अनिकेत मेश्राम, समीर चांदेकर , आदित्य गाजलेकर , चेतन मोहूर्ले , हर्षदीप लभाने , प्रेम साखरकर ,शुभम नरगडे , ओमप्रकाश भवरे , आकाश इंगोले ,सुरज नारगडे , निखिल कुटेमाटे , सुरज डंबे ,ओम दावणेकर , पवन बावणे , गौरव ठाकरे ,  यश निकुडे , संयम पाटील , सलीम शेख , तौफिक कुरेशी , प्रेम मेश्राम आणि आदी संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here