Home Breaking News यवतमाळ राकाँतर्फे हाथरसच्या घटनेचा निषेध

यवतमाळ राकाँतर्फे हाथरसच्या घटनेचा निषेध

62
0
तातडिने कारवाई करण्याची मागणी; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन
यवतमाळ : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा या गावातील मुलीवर सामूहिक घृणास्पद अत्याचार करण्यात आला. यात पीडिताचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक व लाजिरवाणी आहे. तातडिने दोषीवर कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. याकरीता यवतमाळ येथील आझाद मैदानालगत असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ (ता. २)ला  शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी  युवक काँग्रेस यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आशिष मानकर, प्रदेश सरचिटनीस पंकज मुंदे, अतुल गुल्हाने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निरीक्षक सारिका ताजने,  राष्ट्रवादी युवक काँग्रेस (यवतमाळ शहर) अध्यक्ष शेखर सरकटे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषा काटे, गौरव कदम,  दीपक धात्रक, वेदांत बोरखंडे,  संकेत लांभठ, यश कदम, तेजस पाटील, जित पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या यवतमाळ तालुका अध्यक्षा दक्षता दंभारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पांढरकवडा अध्यक्षा शीतल कुरटकर, कोमल गजभिये,  वैष्णवी काळे,इत्यादी उपस्थीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here