Home Breaking News कळंब महाविकास आघाडीतर्फे उत्तरप्रदेश सरकारचा निषेध

कळंब महाविकास आघाडीतर्फे उत्तरप्रदेश सरकारचा निषेध

18
0
कळंब : स्थानिक कळंब इंदिरा चौकात उत्तरप्रदेश मधील हाथरस जिल्यात तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत (ता. ३)ला श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राहुलजी गांधी यांच्यावर केलेल्या दडपशाहीचाचा सुद्धा निषेध करण्यात आला. अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, तसेच या तपासात दिरंगाई करणा-या शासन यंत्रणेवर कठोर कारवाई करावी,  सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवण्यात यावा, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी सभेचे अध्यक्ष महादेव काळे हे होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांनी केले. संचालन अशोकराव उमरतकर यांनी केले. यावेळी मुरलीधर देहनकर, महादेव काळे, ज्योती तुंडलवार, देविदास काळे, अभिषेक पांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मधुकरराव गोहणे, गजानन पंचबुद्धे, सोनू शिद्धीक, अशोकराव उमरतकर, बसहेश्वर माहुलकर, निलेश हजारे, निलेश नवाडे, प्रशांत देहनकर, सिद्धेश्वर वाघमारे, इमरान भाई, सारिका ठोंबरे, आकाश काटे, नयन बारदमवार, सौरव मिठे, निवेदिता खासळे, अर्चना हजारे, मंजुषा हजारे, भारती दहेकर, नीलिमा हजारे, सुवर्णा हजारे, गायत्री नवाडे, संगीता गावंडे, ज्योती  तुंडलवर,भाग्यश्री माहुलकर, सुधाकर पवार,  मुनिअर अली सैय्यद, , महादेव काळे , दिलीप डवरे, अभिषेक पांडे, पवन कासार, शुभम कांबळे, मनोज पिसे, अमोल मेश्राम, जावेद सैय्यद, प्रफुल ठाकरे,देविदासभाऊ काळे, प्रज्वल दरवळकर, अखिलेश साळवे, निखिल किंगवकर, विठल भरत, अनिकेत तुळसकर, राहुल चावरे, फिरोज आली, विनोद ठाकरे, रितेश पांढरे, शफीक कुरेशी, सोनी सिद्दीकी, सैय्यद इमरान अली,अब्दुल खालीब खतीब,मोहन होकम, प्रशांत भोयर, निलेश मेश्राम, प्रतीक बारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here