Home Breaking News कार्यकर्त्यांत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची क्षमता हवी : देवा जगताप

कार्यकर्त्यांत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची क्षमता हवी : देवा जगताप

41
0
देवा जगताप यांचे प्रतिपादन : भीम पँथर संघटनेच्या फलकाचे अनावरण
पुसद : विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भीम पँथर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणून भीम सैनिक म्हणून संविधानिक मार्गाने सामाजिक कार्य करता येईल. अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उध्दार करणे आपले पहिले कर्तव्य आहे असे प्रतिपादन, देवा जगताप यांनी केले.
पुसद-बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्ष विचारावर आधारित भीम पँथर संघटनेच्या फलकाचे अनावरण (ता.३) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन पुसद येथील विश्वरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर वार्डात करण्यात आले होते.
सर्वप्रथम समस्त बहुजनवादी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन भीम पँथर संघटनेचे संस्थापक भाई देवा जगताप यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर मोची समाजाचे नेते सुरज कुरील यांचे हस्ते भीम पँथर संघटनेच्या फलकाचे अनावरण थाटात करण्यात आले. या फलक अनावरण सोहळयाला संघटनेचे संस्थापक भाई देवा जगताप यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील खडसे, डॉ. शंकर दळवे, माधव हाटे, आकाश सावळे काउंटर मेंबर, गणेश कांबळे, युवा जिल्हा अध्यक्ष भाई विकास सरोदे, भय्यासाहेब मनवर युवा उपजिल्हा अध्यक्ष, शेख सलीम (सरचिटणीस यवतमाळ जिल्हा) मो.अजीम शेख (ता.संघटक), राम विलास हडसे (शहर अध्यक्ष) सुरज भाई कुरील(शहर संघटक) राहुल कुरील, निलेश वानखेडे, सुमित कांबळे, नागेश कांबळे, सुरेश भगत, महादेव लांबे, आम्रपाल सरोदे, मजहरभाई, सचिन पवार यांची विशेष उपस्तिथी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here