Home Breaking News ‘त्या’ नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

‘त्या’ नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी

39
0
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : पोलिस अधीक्षकांना निवेदन
यवतमाळ : उत्तर प्रदेश या राज्यात हाथरस जिल्ह्यातील एका तरुणीचा अमानुष शारीरिक छळ करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना पीडितेचा मृत्यु झाला.  यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. तसेच घडलेली घटना ही समाजाला काळीमा फासणारी असून क्लेशदायी व निंदनीय प्रकारची आहे. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालविण्यात यावे व लवकरात लवकर चौकशी करून संबंधित नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाच्यावतीने  १ ऑक्टोबर 2020 रोजी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा क्रांती राऊत, जिल्हा सचिटणीस स्वप्नील खोब्रागडे, लालजी राऊत तसेच अश्विन कयापाक, सुमित लांडगे, श्रेयश मुटकुरे, प्रशांत किर्दक, राजीक पठाण, दीक्षा नगराळे, मनीष आडे, योगेश आडे, राज खोब्रागडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here