Home Breaking News रंभाजी नगरमध्ये विविध समस्यांचा डोंगर

रंभाजी नगरमध्ये विविध समस्यांचा डोंगर

36
0
प्रशासनाचे दुर्लक्ष : उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
यवतमाळ : शहरालगत असलेल्या वाघापूर परिसरातील रंभाजी नगर, , वार्ड नं. 15 येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कामा संदर्भात येत असलेल्या नाली व रपटा याचे बांधकाम अर्धवट असल्याने तेथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नालीतील घाण पाण्याचा प्रवाह थांबला असून सर्वत्र दूर्गंधी पसरली आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता येथील समस्यांचे तातडिने निवारण करावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे (ता. १) मजीप्राच्या  कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली.                                                                   वाघापूर परिसरातील  रंभाजी नगर, वार्ड नं. 15 येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे काम चालू असतांना ब-याच ठिकाणी जेसबीच्याकामा दरम्यान जुनी नाली व रपटा पूर्णपणे ध्वस्त झाले आहेत.  यामुळे नालीचा वाहता प्रवाह थांबून गेला असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  रपटा पूर्णपणे ध्वस्त झाल्याने वाहतुकीस प्रतिबंध निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असलेले नाली चे पाणी साचून बरेच दिवस उलटून गेले आहेत. सायंकाळी एक दूध विक्रेता त्याच्या गाडीवर दूध घेऊन संबंधित रस्त्यावरुन जात असतांना तो रपट्यातील खोल खड्यात गाडीसहित पडला. यामुळे त्याला शारीरिक इजा झाली व त्याचे दूध पुर्णपणे नाली मध्ये वाहून गेले. सायंकाळी बरीच लहान मुले बाहेर खेळत असतात, त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.   नाली व रपटा याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अश्विन कयापाक यांच्या पुढाकारातून निवेदन देणात आले आहे. निवेदन देतांना जिल्हा चिटणीस स्वप्नील खोब्रागडे, सुमित लांडगे, श्रेयश मुटकुरे, प्रशांत किर्दक, राजीक पठाण, दीक्षा नगराळे, मनीष आडे, योगेश आडे, राज खोब्रागडे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here