Home Breaking News दिग्रसची सना गाजवतेय वक्तृत्वाचा राज्यमंच!

दिग्रसची सना गाजवतेय वक्तृत्वाचा राज्यमंच!

75
0
तेराशे लोकांनी दिली तिच्या भाषणाला अव्वल पसंती
दिग्रस : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाद्वारे दमदार विद्यार्थी वक्ता महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत मूळची हरसूल येथील रहिवासी वर्ग दुसरीची विद्यार्थिनी सना आमीन चौहान स्पर्धेत उतरली आहे. ती ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे नाव नावलौकीक करीत आहे. तेराशे लोकांनी तिच्या भाषणाला अव्वल पसंती दिली असून, तीनशे लोकांनी प्रतिक्रिया नोंदवत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वत्र चिमुकलीच्या कलेचे कौतुक होत आहे.
अ आणि ब अशा दोन गटात होणाऱ्या ह्या स्पर्धेत राज्यभरातून एकापेक्षा एक सरस स्पर्धक सहभागी झाले आहेत. कोविडमुळे प्रत्यक्ष स्पर्धा न घेता भाषणाचा व्हिडीओ आयोजकांना पाठवून आपला सहभाग नोंदवायचा होता. अगदी पहिल्या वर्गापासून तर दहावी पर्यंतच्या शेकडो विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शाळेतील छोट्या स्पर्धा आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारी चुणचुणीत सना पहिल्यांदाच अशा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली आहे. मात्र, या स्पर्धेतही तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असून, ती सर्वांचे मोठे आकर्षण ठरली आहे. अवघ्या चार दिवसात साडेचार हजार दर्शकांनी तिच्या भाषणाचा आनंद घेतला आहे. तेराशे लोकांनी तिच्या भाषणाला अव्वल पसंती दिली असून, तीनशे लोकांनी प्रतिक्रिया नोंदवत आपला आनंद व्यक्त केला आहे. लॉकडाऊन काळातील सामाजिक जीवन ह्या विषयावर सनाचे हिंदीत ओजस्वी भाषण दिले आहे. स्पष्ट उच्चारण, हावभाव, साभिनय सादरीकरण, विषयावरची घट्ट पकड आणि तिचा प्रचंड आत्मविश्वास भाषणातून जाणवतो. सनाने आपल्या भाषणातून कोरोनापासून बचावासाठी एसएमएसचा मंत्र दिला आहे. एसएमएसचा मंत्र प्रत्येकाने कटाक्षाने पाळल्यास कोरोनाच्या महामारीतून आपण अखिल मानव जातीला सहज वाचवू शकतो असा आशावाद या चिमुकलीने भाषणातून मांडला आहे. सनाने आपल्या भाषणात मागितलेले एसएमएस प्रॉमिस परिसरात कौतुकाचा विषय झाला असून, ती अ गटात व्हिवज, लाईक, कमेंटबाबतीत टॉप पाईव्हमध्ये असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here