Home Breaking News डॉ.नंदुरकर विद्यालयात म. गांधी, लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन

डॉ.नंदुरकर विद्यालयात म. गांधी, लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन

29
0
यवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती डॉ. नंदुरकर विद्यालयात जागतिक अहिंसा दिन म्हणून अभिवादन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मंगेश शहारे, समस्त शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व प्रथम मंगेश शहारे यांच्या हस्ते महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना पुष्पार्पण केले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून महात्मा गांधी यांच्या जीवनावरील प्रश्नमंजुषा पाठवून जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनातून चांगला संदेश घेऊन जीवन घडवण्याबद्दल अभिमत आज जयंती प्रसंगी व्यक्त करण्यात आले. जागतिक अहिंसा दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचे नियोजन शाळा प्रशासनाने केले. हा जयंती समारोह पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here