Home Breaking News कर्जमाफी कागदावरच; अजूनही अनेक शेतकरी वंचित

कर्जमाफी कागदावरच; अजूनही अनेक शेतकरी वंचित

62
0
युवक काँग्रेसचा आरोप : कर्जमाफीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन
यवतमाळ : विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ यवतमाळच्या जिल्ह्या दौर्‍यावर आले असताना हिवरी येथील गुणवंत विद्यार्थिनी सानिका पवार हिची भेट घेतली. या दरम्यान, युवक काँग्रेसतर्फे शेतकर्‍यंाची कर्जमाफी संदर्भात (ता.4) निवेदन देण्यात आले. कर्जमाफीची घोषणा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, प्रत्यक्षात ही कर्जमाफी कागदावरच झाल्याचा, आरोप देखील या निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफी होणार की नाही, असा प्रश्‍न कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांकडून केल्या जात आहे.
सीएसएमएसएसवाय अंतर्गत 01 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 पर्यंतचे दिड लख माफ केले जाणार होते, शिवाय, नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना देखील अनुदान मिळावे, 30/09/2020 चे शासनाचे लिपीक व शिपाई पदभरती ठेकेदारी पध्दतीने पदभरती करण्याचा आदेश तातडिने मागे घेण्याची मागणी युवक काँग्रेसचे कुणल जतकर यांनी केली आहे. शेतकर्‍यांना केलेली कर्जमाफी नावपुरतीच ठरल्याने प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहे. वंचित असलेल्यांना तातडिने कर्ज माफ करावे, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here