Home Breaking News हिवरीची गुणवंत सानिका विधानसभा अध्यक्षांकडून सन्मानित

हिवरीची गुणवंत सानिका विधानसभा अध्यक्षांकडून सन्मानित

55
0
कुठल्याही प्रकारची मदत करण्यास तत्पर : गौरवप्रसंगी नाना पटोले यांचे भावनिक उद्गार
हिवरी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गुणवंत विद्यार्थिनी सानिका सुधाकर पवार हिचा गुणगौरव केला. कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आपल्याशी संपर्क कर, असे सांगून नाना पटोले यांनी या विद्यार्थिनीला मोठा आधार दिला आहे. यावेळी तिला एक लाख पाच हजार रुपयांचा धनाकर्ष (डीडी) देण्यात आला.
कर्जापायी सानिकाचे वडील सुधाकर पवार यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा मृतदेह ‘शवचिकित्सेसाठी शवागारात होता. त्याच दिवशी सानिकाचा दहाव्या वर्गाचा संस्कृत विषयाचा पेपर होता. दुःख बाजुला ठेवत तिने धिरोदात्तपणे परीक्षा दिली आणि घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सानिका व तिच्या कुटुंबीयांना मदतीचा धनाकर्ष देताना नाना पटोले. नाना पटोले यांनी रविवारी तिच्या घरी जावून गौरव केला. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी सरपंच रामकृष्ण लोंढे, दिनेश राऊत, वंदना मुरखे, अमोल मेहरे, अजय राठोड, विठोबा कोडापे, ग्राम विकास अधिकारी बी.एन. ठाकरे, नारायण हुलगुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विदर्भ किसान परिषदेचे विदर्भ प्रमुख देवानंद पवार यांनी मांडली. संचालन देवानंद जाधव यांनी केले. बंदोबस्ताची जबाबदारी सहायक पोलीस निरिक्षक जी.डी. करेवाड यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here