Home Breaking News जिल्ह्यात 13 नव्याने पॉझेटिव्ह

जिल्ह्यात 13 नव्याने पॉझेटिव्ह

112
0

यवतमाळ, दि. 5 : जिल्ह्यात गत 24 तासात 13 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 46 वर्षीय आणि दिग्रस तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 13 जणांमध्ये 10 पुरुष व तीन महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील चार पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील एक पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 204 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8761 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 274 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 233 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 76241 नमुने पाठविले असून यापैकी 75393 प्राप्त तर 848 अप्राप्त आहेत. तसेच 66632 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here