Home Breaking News देशविदेशातून ‘बापूं‘ना ऑनलाइन मानवंदना

देशविदेशातून ‘बापूं‘ना ऑनलाइन मानवंदना

36
0

वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद : शेकडो स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

यवतमाळ : महात्मा गांधींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर ला, ‘वंदे बापू’  या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारतातील विविध राज्यातून तसेच कतार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि यूएई या विविध देशातून २५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तब्बल दीड महिन्यांपासून रंगलेली ही स्पर्धा ३ चरणांमधून झाली. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या ३६ स्पर्धकांनी गांधीच्या जीवनावर त्यांच्या वक्तृत्व क्षमतेचे अमोघ प्रदर्शन केले.

स्पर्धेचा विषय हा महात्मा गांधी व त्यांच्या विचारांची २०२० मधील संयुक्तता हा होता. सदर स्पर्धा ही वय गट ४ वर्षे ते ७० वर्ष यामध्ये चार गटात विभागणी करून घेण्यात आली. या स्पर्धेतली नावीन्यपूर्ण गोष्ट अशी की आयोजकांनी स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच स्पर्धकांना त्यांच्यातील सुप्त वक्तृत्व गुणांना उभारी कशी येईल याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले. स्पर्धकांसाठी वक्तृत्व कसे असावे, ते बहारदार कसे करता येईल, त्यासाठी भाषण कसे करावे, टिपणे कशी काढावीत, कमी शब्दात आपले विचार कसे मांडावे, या सर्व विषयावर मान्यवरांकडून खास सत्र आयोजित केल्या गेले. तसेच महात्मा गांधींच्या संदर्भातील युवकांच्या सर्व प्रश्नांना श्री. चंद्रकांत वानखेडे व प्राध्यापक श्री.प्रसाद गोलंपल्ली यांच्याकडून सविस्तर उत्तर दिले गेले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण वीस मान्यवरांनी परीक्षक म्हणून आव्हान पेलले.

अंतिम फेरीत पोहोचेलेल्या अ  गटातील(वय ४ ते ८) मधील सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहनपर मेडल्स दिले गेले. गट ब मधून हर्षदा पाटील (भारत),  तान्या सेबॅस्टियन (कतार) आणि दिया तलरेजा (कतार) , गट क मधून मित्रा नायर, निरत पै आणि तीशा जैन (कतार) , गट ड मधून प्रशांत खंडारे (भारत), अनंत इंगोले(भारत) आणि सौ.स्नेहा टोम्पे (भारत) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले.

या स्पर्धेचे आयोजन डॉ. चेतन दरणे, अनिकेत आमडेकर, पंकज शेवकर, अक्षय कावरे, अखिलेश लुंगे,अश्विन सोरते,मिथिला केळापुरे व डॉ. अश्विनी दरणे  यांच्या मार्गदर्शनात पार पडले. या स्पर्धेसाठी परीक्षकांची भूमिका प्राध्यापक प्रदीप झिलपिलवार, डॉ.आचरेकर, मारुती रेवणकर, ब्रिजेश देशपांडे, श्री.मयुरेश तुंगारे व सौ.विद्या खडसे यांनी पार पाडली.आगामी काळात वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना मंच उपलब्ध करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा मानस डॉ. चेतन दरणे व त्यांच्या टीम चा आहे. पुढील स्पर्धा दिवाळी निमित्त आपापसातील माणुसकी जागृत करणे व छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन या विषयावर होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here