Home Breaking News जिल्ह्यात 50 नव्या कोरोनाबाधितांची भर; 114 रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात 50 नव्या कोरोनाबाधितांची भर; 114 रुग्णांची कोरोनावर मात

80
0
यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यातील 114 जणांनी कोरोनावर मात केली असून 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर पांढरकवडा तालुक्यातील 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 50 जणांमध्ये 35 पुरुष आणि 15 महिला आहेत. यात यवतमाळ तालुक्यातील 18 पुरुष व चार महिला, राळेगाव येथील दोन पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील दोन पुरुष व तीन महिला, कळंब येथील तीन पुरुष व तीन महिला, घाटंजी येथील एक पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष व एक महिला, मारेगाव येथील दोन पुरुष व एक महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 339 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8818 झाली असून बरे झालेल्यांची संख्या 7559 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 284 मृत्युची नोंद आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेले माहितीनुसार सुरवातीपासून आतापर्यंत 77293 नमुने पाठविले असून यापैकी 76341 प्राप्त तर 952 अप्राप्त आहेत. तसेच 67476 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here