Home Breaking News स्थगिती आदेशाची भाजपाकडून होळी

स्थगिती आदेशाची भाजपाकडून होळी

41
0
यवतमाळ | शेतकऱ्यांची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने सर्वसंपन्न करण्यासाठी व व्यापारी आणि अडते यांच्या आर्थिक पिळवणुकीतून मुक्तता करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या हिताचे तीन कायदे पारित केले आहेत परंतु सदर आदेशाविरुद्ध स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी समजणारे महाविकास आघाडीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, यांनी पणन संचालक पुणे यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे . त्यामुळे शेतकाऱ्यांना बाजार समितीचे बेकायदेशीर शुल्क अदा करावी लागणार आहे, तसेच शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीच्या बाहेर सुद्धा विकता येणार नाही. या आदेशामुळे फक्त व्यापारी व अडते यांचे हित जोपासण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे . महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशाची होळी आज कॉटन मार्केट चौकात करण्यात आली .
आमदार मदन येरावार व जिल्हाध्यक्ष नितिन भूतड़ा यांच्या मार्गदर्शनात ,या आंदोलन चे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार ,शहराध्यक्ष प्रशांत यादव पाटिल ,तालुका अध्यक्ष जितेंद्र वीरदडे पाटील, बाळासाहेब शिंदे  , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माया शेरे, राजेंद्र डांगे, विजय खडसे, जयदीप सानप, सुनील संमदुरकर ,युवा मोची अध्यक्ष मीनल पांडे , आकाश धूरट, अधिन बोबचे भाविन पतिरा, दिलीप पुरी संजय शिंदे पाटील, उषा खटी, वैशाली खोंड, किर्ती राऊत, प्रमोद पाटील, योगेश चव्हाण, राजू झामरे, सौ संगीता कासार,, नाना येवले, विशाल बावणे, प्रशांत देशमुख ,जयदेव लकडस्वार ,सुरज गुप्ता, अभिलाष ठाकरे, सुरज जैन, योगेश पाटील, भरत ब्राह्मणकर, संजय काळे, संदीप कापसे, हेमंत डायमा, मनोहर चंदनखेडे ,श्रीकृष्ण कांबळे, कार्तिक ताजणे ,शुभम चोरमुले अधिन तिवारी ,राहूल मेहेत्रे , राहुल गर्जे,राधिका वारे, आदी सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व जनप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here