Home Breaking News मुसळधार पावसाची शक्यता

मुसळधार पावसाची शक्यता

19
0
यवतमाळ : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास तुरळक प्रमाणात हजेरी लावली. असे असले तरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
यंदा जिल्ह्यात सरासरी पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडलेल्या पावसामुळे शेतकरीसुद्धा सुखावला होता. त्यामुळे कापूस, सोयाबीन पिकांची लागवड शेतकऱ्यांनी लवकरच आटोपून घेतली होती. अशात जून तसेच जुलै महिन्यात अधून मधून पाऊस कोसळला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत होते. तर छोटे, मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले होते. सध्या ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडलेल्या पावसामुळे तूर, मुग आदींचे प्रचंड नुकसान झाले. तर सोयाबीनलासुद्धा पावसामुळे बुरशी लागल्यासारखे झाले होते. असे असताना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली. अशा परिस्थितीत सोयाबीन सोंगण्यास सुरूवात झाली आहे. तर कापूस काढण्यास सुद्धा सुरूवात झाली असून, आता शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here