Home Breaking News खावटीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हाकचेरीवर

खावटीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हाकचेरीवर

17
0
यवतमाळ : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खावटी वाटपाचे शासन निर्णयातील आदिवासी मजुरांच्या पात्रतेबाबत निकष शिथिल करण्यात यावे, मनरेगा जॉबकार्ड धारकांना खावटीचा तातडीने लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह आदिवासी मंत्र्यांना पाठवण्यात आले.
राज्यातील मनरेगावरील चार लाख कुटूंबीयांना, आदिम जमातीच्या सर्व दोन लाख २६ हजार कुटूंबाना, पारधी जमातीच्या ६४ हजार कुटुंबांना आणि वनहक्कधारक एक लाख ६५ हजार अशा एकूण ११ लाख ५५ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. यवतमाळ जिल्हा राज्यात आदिवासी बहुल क्षेत्र असलेला जिल्हा आहे. कोरोना महामारी व अतिवृष्टीच्या तांडवाने जिल्ह्यातील आदिवासी मजुरांना सर्वाधिक फटका बसला आहे.शासन निर्णयातील निकषानुसार जे आदिवासी मजूर मनरेगावर १ एप्रील २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत एक दिवस कामावर कार्यरत असावा असा निकष निर्धारित केला आहे. गाव खेड्यातील मजूर कामे उपलब्ध नसल्याने उपासमार टाळण्यासाठी शहरात कामे शोधत होती, तर काही परप्रांतात कामासाठी गेली. ग्रामीण भागातील ९५ टक्के आदिवासी बांधवांमध्ये शासनाच्या या घातक निकषामुळे खावटीपासून वंचित राहण्याच्या भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने हा निकष शिथिल करून आदिवासी मजुरांना जॉब कार्डवर सरसकट खावटी योजनेचा लाभ लागू करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी वंचित आघाडीचे जिल्हा निरीक्षक प्रमोद इंगळे, अॅड. शाम खंडारे, धनंजय गायकवाड, शैलेश भानवे, लक्ष्मीकांत लोळगे, कुंदन नगराळे, शिवदास कांबळे, लक्ष्मण पाटील, धम्मावती वासनिक, सरला चयाने, श्रीकांत खोब्रागडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here