Home Breaking News ‘आरेची जागा राखीव’ वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी : संजय राठोड...

‘आरेची जागा राखीव’ वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी : संजय राठोड वन मंत्री

30
0
मुंबई : मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व मा. आदित्यजी ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री यांचे निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत(दुग्धव्यवसाय विकास विभाग) ताब्यातील 328.90हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली
आरे दुग्ध वसाहत येथील जमीन ही राखीव वने म्हणून घोषित करावी याबाबत दिनांक 2.9.2020 रोजी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज दुग्ध व्यवसाय विभाग व वन विभाग यांचेकडून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 ची प्राथमिक अधिसूचना व मनोदय घोषित करण्याची अधिसूचना काढणेस मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.
प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी कोकण नवी मुंबई हे उक्त जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचेकडे अपील करता येईल.
आरे दुग्ध वसाहत(दुग्धव्यवसाय विकास विभाग) ताब्यातील 328.90हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 नुसार प्राथमिक अधिसूचना मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर चौकशी होऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 20 ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल अशी माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here