Home Breaking News जिल्ह्यात 52 नवीन पॉझेटिव्ह ; 63 जणांना सुटी

जिल्ह्यात 52 नवीन पॉझेटिव्ह ; 63 जणांना सुटी

68
0

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यात गत 24 तासात 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 789 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8920 झाली आहे. तर आज 63 जणांना सुटी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 7673 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 284 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 78788 नमुने पाठविले असून यापैकी 77964 प्राप्त तर 824 अप्राप्त आहेत. तसेच 69044 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here