Home Breaking News यु-टयूब व्हीडीओंच्या माध्यमातून संतोषने बनविली चार्जींग सायकल

यु-टयूब व्हीडीओंच्या माध्यमातून संतोषने बनविली चार्जींग सायकल

156
0
ताशी स्पीड ३० किमी, संतोष कावळेच्या एक महिन्याच्या तपस्याचे फळ, नागरिकांकडून कौतुक
तालुका प्रतिनिधी  (DIGITAL NEWS PAPER):-
प्रतिनिधी/अंकूश कावळे

89832 22328

महागांव :-  यु-ट्यूब वर व्हीडीओ बघतांना त्या ज्ञानार्जनाचा उपयोग सदगूणांसाठी तरी कधी केवळ मनोरंजनासाठी घेतात. मात्र, मनावर घेवून काहीतरी वेगळे करण्याची कला हे क्वचितच आढळते. महागाव येथील तरुणाने असाच एक उपद्रव प्रयत्न करीत चक्क चार्जींग सायकल बनविली आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे’ याची प्रचिती फक्त चवथा वर्ग शिकलेल्या या तरुणाने प्रात्यक्षिकातून दाखविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सायकलची ताशी गती ३० किमी असल्याने या सायकलचा उपयोग अनेक व्‍यक्ती दळणवळणासह व्‍यायामासाठी देखील करु शकतात.
महागाव शहरातील इंदिरा प्रभाग क्र. ३ नगरमधील  संतोष मारोती कावळे  हे तरुण व्‍यवसायाने (बांधकाम मिस्त्री) फक्त चौथा वर्ग शिकलेला. दारीद्र्याची परिस्थिती. हातावर आणने आणि पानावर खाने एवढ्यावरच न थांबता कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रोजमजूरी करुन उदरनिर्वाह करणे हा त्याचा नित्यक्रम. परंतु, आपण जगावेगळे काही करु शकतो, याची त्याला जिद्द होती. त्याने मोबाईलचा सदूपयोग घेत यु-ट्यूब वर नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हीडीओ बघितले. व त्यातून त्याला चार्जींगची सायकल बनविण्याची कल्पना सुचली.
अशी बनविली सायकल
या युवकाने आपली रोजमंजुरी काम करीत जुनी रेंजर सायकल विकत घेऊन आवश्यक वस्तू विकत घेऊन चार्जिंग वरची सायकल तयार केली. सायकल चालु करण्यात एक महीना लागला. सायकल ला सम्पुर्ण खर्च १५ हजार  रुपये आला. संतोषने  सायकलच्या मागच्या चाकाला मोटर बसवली व त्याचे कनेक्शन कंट्रोलर ला दिले. सायकल च्या हँडलवर हेडलाईट बसवले आहे. ही सायकल तीन घंटे चार्ज केल्यानंतर तीसच्या स्पीडने चाळीस किलोमीटर चालते समजा चार्जिंग सपल्यास पॅडल मारुन चालवता येते. बॅटरी चोवीस व्हॅट ची बसवली आहे. हँडलला अँक्सीलेटर चे कनेक्शन दिले आहे.त्यामुळे खरा अर्थाने ती मोटर सायकल झाली आहे. सदर मोटर सायकल पर्यावरण पुरक असुन ती तयार करण्याकरिता एँक्सलेटर कंट्रोलर किट विकत घ्यावी लागली. गुगल युटुब यावर विविध विषयांची माहिती मिळु लागली. मुळातच काहीतरी नविन तांत्रीक बाब शोधुन वेगळे करण्याची प्रवृत्ती असलेल्या संतोषने युटुब वरुन चार्जिंग वरची सायकल तयार करता येईल का ? याचा त्याने शोध घेतला व तो यशस्वी झाला. संतोष कावळेने दिवस रात्र मेहणत करुन चार्जिंग वरची सायकल तयार केली आहे. आपल्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी  अनेक जण विविध उपाययोजना करतात.
नागरिकांकडून संतोषचे कौतुक
चार्जिंग वर पळणारी  सायकल पाहुन नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. व महागांव शहरातील नागरिकांनी व्वा म्हणुन शाबासकी ची थाप दिली. संतोष ने केलेल्या कामगिरीचा आनंद त्याचा चेहर्‍यावर दिसत होता. त्यांच्या आनंद पाहुन संतोष ची आई नंदाबाई कावळे हिचा पण आनंद मावेनासा झाला होता. यावेळी सुधाकर वाघमारे, रवि वाघमारे, पांडुरंग सावळे, राजकुमार रावळे, भगवान हातमोडे, शिंदे सेवानिवृत्त लाईनमन इ नागरिकांनी  चार्जिंग वरची सायकल पहायला गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here