Home Breaking News पुसद येथे शिक्षा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे निशुल्क कार्यशाळा

पुसद येथे शिक्षा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे निशुल्क कार्यशाळा

46
0
पुसद : शहरातील वसंत नगरमधील आझमी हाइट्स  येथे रविवारी  सकाळी 11 वाजता शिक्षा स्पर्धा परीक्षा केंद्रातील मार्गदर्शक प्राध्यापक सलमान सय्यद यांनी सर्व विद्यार्थ्यांकरीता निशुल्क एक दिवसीय पोलीस भरती विशेष कार्यशाळा आयोजित केली होती.. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहिनुद्दीन इक्बाल सर तसेच मार्गदर्शन आसिफ सर एस टी आय हे होते. आसिफ यांनी विद्यार्थ्यांना लेखी आणि मैदानी चाचणी बद्दल तसेच इतर स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक सलमान यांनी केले तसेच मान्यवराचे स्वागत सुद्धा सलमान यांनी केले. आसिफ एकबाल यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here